पुजा विराज कुटे

नमस्कार, माझे नाव पुजा विराज कुटे आहे!

माझं नाव पुजा विराज कुटे आहे. मला कविता करण्याची आवड वयाच्या १२व्या वर्षांपासुन झाली. ईयत्ता ८वी पासुन कविता, लेख, चारोळ्या यांच्याशी माझं नातं जुळवुन आलं. माझी पहिली कविता "माझे मन".

खरंतर या वयात मुलीच मन, हृदय या अशा शब्दांशी काही संबंध नसतो पण त्याच वयात मला माझ मन उलघडल. मग नंतर त्याच कविता माझा श्वास झाल्या. उठता,बसता अगदी झोपेत सुद्धा शब्दांशी मी खेळत गेले आणि त्याच्याशी खेळता खेळता मलाच मी उलगडत गेले.

खरंतर माझ्या या गुणांच कोणालाच कौतुक नव्हते. घरच्यांना तर आश्यर्य वाटलं की मी हे अस कशी लिहु शकते माझा दादा आणि ताई तर मला कोणाची तरी कविता तु चोरतेस अस बोलायचे पण नंतर त्यांचा विश्वास बसला की मी हे करु शकते.

Contact Me

" शब्दांनी घडविले ... शब्दांनी उलघडले ... शब्दांचा हा खेळ सारा ... शब्दांनीच मिळवले ... "

~ पुजा विराज कुटे

" शब्द हे माध्यम आहे शब्दांच्या भावना शब्दांपर्यंत पोचविण्याचे "

~ पुजा विराज कुटे
पुजा स्पंदन ह्रुदयातले

Email me

spandanhrudyatale@gmail.com

मी काय करते

मराठी कविता

कवीने शब्दांशी खेळलेला खेळ

मराठी लेख

गोष्टींचा सवेंदनशील संदर्भ

मराठी चारोळ्या

मोठ्या भावनेचं छोट्याशा शब्दांतुन व्यक्त होणं

मराठी / हिंदी गाणी

भावनांनी सुराशी धरलेला ताल

माझ्या कविता

  • सर्व प्रकार
  • आठवण कविता
  • मैत्री कविता
  • प्रेम कविता
  • इतर कविता

प्रेम...

आईच्या गर्भातून ज्याची सुरूवात होते ते "प्रेम" वडीलांच्या रागातही जी भीती असते प्रेम... ते असतं "प्रेम " बहीणीने दिलेला विश्वास , भावाने केलेली काळजी ते असतं "प्रेम "

मैत्रीतील अबोला,रुसवे-फूगवे जपत ती हळुवारपणे फुलवणे हेच असतं प्रेम "

पहील्याच भेटीत आपलंस वाटणे ते असतं प्रेम

उशीला बिलगून भावना व्यक्त न करता खूप रडणे ते असतं "प्रेम "

मनाने मनाशी जुळणे ते असतं "प्रेम "

स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी लडण-झगडण ते असतं "प्रेम "

सुख-दुःखात समान भागीदार असणं ते असतं "प्रेम "

अंतरपाठावर उभे राहून नजर लपवत एकमेकांना पाहण हेच असतं "प्रेम"

एकमेकांना हक्काने चिडलण,ओरडण,रागावण आणी प्रेमाने समजुत घालणं हेच असतं "प्रेम"

प्रेमाला भाषा नसते असते ती फक्त भावना हृद्याला हृद्याशी जोडणारी दूवा हेच तर असतं "प्रेम "

मैत्री एक बंध 👭👬

ते नातच निराळ असतं

प्रेमाच,आपुलकीच ,जिव्हाळ्याच,सोबतीच ते नातच निराळ असतं...

रक्ताच नसून ते मनाच असतं गुरफटललेल्या वेलीप्रमाणे एकमेकांत गुंतवलेला असतं upsetअसल्यावर its okk रे म्हणणार ते नातचं निराळ असतं...

रडत असताना आपल्या अश्रूंना जपणारं खोडकरपणा करून अपणास हसवणारं अब बोहत हुआ यार....म्हणत situation ला सांभाळणारं ते नातचं निराळ असतं...

आपल्या सकट आपल्या गुणदोषांना स्विकारणार स्वतः हसत इतरांना हसवणार वेळ पडलीच तर आपल्यासाठी लडणारं आणि शक्य झाल्यास आपल्यासाठी मरण ही पत्करणार स्वतःच्या भावना share करणार रफ-टफ वागणारं ते नातचं निराळ असतं...

दुरावा आल्यावर फक्त आठवणीत जगणार Try try but don't Cry करत Social Sites वर आपल्याला शोधणार ते नातच निराळ असतं मैत्रीच हे नात खरचं निराळ असतं...

शब्द ...

काही मनात दडलेले असतात ,

काही ओठांवर उमटतात दडलेल्या भावानांना वाचा फुटत नाही

आणि ओठांत उमटलेल्यांना परत मिळवता येत नाही

आपल्या माणसांना दुखावलेल आपल्याला पाहवत नाही

पण, आपण दुखावलो तेही सहन होत नाही शब्दांनी दुखावलेल्या त्या मनाला कुणी सावरू शकत नाही

काही शब्द आनंदाचा वार्षाव आणतात ,

काही मनावर जखमांचे घाव घालतात

शरीरावरील जखमा पूसल्या जातात पण, मनावरील जखमांचे पाठ आयुष्यभर वाहातात

मनात प्रश्न भरपूर असतात पण त्यांची उत्तरे नसतात

शब्दाचा हा खेळच असा कोडे बनून राहतात

शब्द असेच असतात काहींना जोडतात काहींना तोडतात तुटलेले हे मन तरीही सुखद आयुष्य जगतात

नकाराच्या त्या शब्दांनी आयुष्य उद्धस्त होते आपले कूणीच नाही असे सतत वाटत राहते

स्वप्न बनुन जगण्यात या काहीच अर्थ नसतो अस्तित्व जरी असलं तरी त्याचा व्यर्थ फुकट असतो

स्त्री...

अंकूर ते आले पोटी मुलगी होती ती मुलगा नसशी वंशाचा हा दिवा हवा म्हणूनच समईची ही वात विजवशी आई करु नकोस असे हाल माझे एके काळी तुही मुलगीच होती...

कळी होऊनी जन्म घेऊदे कुशी अशी तु खुडू नकोस फुल होऊनी दरवळेल मी माझा त्रागा करु नको धन्य ते उपकार तुझे धन्य तू होशील माते पोटी तुझ्या हा जन्म माझा तुच ठरशील देवदूत माझे....

जन्माला आली स्त्री म्हणून सत्य कुणी लपवेल का? स्त्रीघृण हत्येचा हा खेळ कधी कोणी थांबवेल का? स्त्री होऊन वयात आली जगासाठी ती नारी झाली आई-बाबांच काळीज हे जगाच्या वाईट नजरा भारी....

स्त्रीशक्तीची ही शक्तीच मारी पार्वतीची ही काली झाली वाईट प्रवृत्तीच्या दुनियेलाही पायतळी तुडवून काडी आद्दल घडवेल वेळोवेळी तिच ठरेल या जगाची नारी....

सजिजाऊंची शान ही सावित्रीचा आभिमान होता कस्तुरबाही मागे नव्हत्या किरण होत्या IPS अधिकारी अंतराळाची सैर करुनी चावला-विल्यम्स ने जगास फिरवले हातावरी महिला doctor त्या एकच होत्या आनंदीबाई जोशीच भारी राष्ट्रपती ठरल्या त्या पाटलीनबाई भारताचा राज्यकारभार त्यांच्याच बुद्धिमत्तेवरी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संसार सांभाळते ती एकटीच नारी आयुष्यभराची नाती जपून जगत राहते क्षणोक्षणी म्हणूनच.... महीलांचा जन्म थांबवूनये कोणी हिच अपेक्षा सर्वांपरी....

एकटया-दुकटया पिल्लाला आधाराची गरज असते आपलं कुणी असावं अशी प्रत्येकाची समज असते

आपल्या स्वप्नांना तुडवून कुणी जाऊ नये दुर स्वप्नांच्या गावी असतो का दुःखाचा पुर

मला एकटीला सोडून कसा जाशील रे दूर

वळून तुला पाहण्याची नव्हती माझ्याकडे काही खुण

तु सोडून गेल्यावर कसं जगावं रे मी

तुझ्या आधाराची गरजा मला नव्हती कधी दिलीस आता तरी भेटाव याची वाटत होती उणीव

आयुष्य हे एकटयाने असतं का रे जगायचं तुलाही वाटत असेलचं की! मला कधीतरी भेटयाचं

एकटीनं आयुष्य जगण्याची सवय झाली आहे आता नको कुणी सोबती या काटेरी वनात मीच शोधीन माझ्या जीवनाच्या वाटा. .

अस का हे...

प्रेम कुणावर कराव कुणावर नाही हे ठरवले जात नाही...

प्रेम नकळत घडून गेल्यवर ते आपणांस कळत नाही...

प्रेम म्हणजे विष्वास असला तरी तो गमवता येत नाही...

प्रेम केल हे सांगताना ओठातून शब्द उमटत नाही...

उमटलेले शब्द पुन्हा मिळत नाही...

आणि एकदा केलेले प्रेम हे कुणावर करता येत नाही...

कितीही प्रयत्न केला तरी पहिले प्रेम हे पुसलं जात नाही...

पुसलेल्या प्रेमाला कधीच प्रेम मिळत नाही...

आणि पुन्हा पुन्हा प्रेम करणा-या व्यक्तीस प्रेमाचा मुळात अर्थच कळत नाही...

जन्मदाते आई तुझे हे कसे फेडू मी पांग

कळीकळीतून संस्काराची तुच फुलवलीस बाग

या बागेतून फूलपाखरू ही तूच उडवलेस आकाशी

आकाशी ही भरारी मारण्या तुझे मन राहिले मजपाशी

तुझ्या कुशीत मी असतांना अंगाई कानी पडे

भरकटलेल्या शब्दांना तुझ्या भावनांची चाल मिळे

लहानपणी तुच दिलास आधार त्या आधाराचे आजवर कुणीच मानले नाही आभार

प्रत्येक दुखाच्या क्षणात तुच शोधलेस तू छोटया छोटया सुखांमुळे भरली माझी भूक

तु जवळ असताना कधी वाटले नाही सुने कारण ओठांवर होते तुझ्या अंगाईचे गाणे

तु दूर गेल्यावर वाटले खूप परके तुझ्या आठवणींच्या जगात जगत होते सारखे

बाहय भागांवरील वेदनापेक्षा अंर्तभागाने कोमेजलीस तू

मनाचा तोल सुटण्याआधी खंबिरपणे जगलीस तू

जन्मदाते आई तुझे मी फेडू शकणार नाही पांग आजवर झेललेल्या दुःखातून सुखाची लावेल रांग तुझ्या या कष्टाचे अनमोल आहे माप.

अश्रू हे डोळयांवाटे पूर होऊन वाहतात

मनातल्या भावनांना तरीही ते समजून घेतात

मनात दडलेल्या शब्दांना वाचा फोडून दूर नेतात दुःखात तर नेहमीच येतात सुखातही आनंदून वाहतात

मोत्यांच्या या अश्रूंना खुप जगावेसे वाटे कधी अचानक ओघळले की अश्रुंना या पालवी फुटते

भरकटलेल्या भावनांतून ओसरलेल्या अश्रूंना नकळत पडलेल्या चांदण्यांतून काळयाभोर नभांना अश्रू बनून दाटलेल्या मनातल्या जखमांना ओळखू शकेल का कुणी, त्या घुसमटलेल्या अश्रूंच्या मनाला.

ऋणानुबंध हे जन्म-जन्माचे हाती हात तुझाच असावा....

मनगठी हा हिरवा चुडा भाळी कुंकू तुझ्याच नावी ठसावा...

हळदी-कुंकूने भरल्या वाटया काळे मनी त्यास शोभून दिसे पती-पत्नीचे हे गोड नाते सप्तपदींनी खुलुन उठे...

प्रेयसीचे प्रेम आणि प्रियकराची प्रित

हे शब्द वेगळे असले तरी जर

त्यांची मतं एक असली ना की मनं जुळतात आणि यालाच तर नात म्हणतात

न... तुटणारी... तार...

तुझी स्पंदन माझ्या स्पंदनांशी जोडली...

तुझ्या श्वासाची नाळ माझ्या मनाने घेरली...

तुझ्या सोबत घालवलेल्या आठवणींत मलांच मी विसरली...

तुझ्या डोळयातला माझ्या बद्दलचा विश्वास

माझ्या वरच्या प्रेमाची कबुली देऊन गेला...

न बोलता तुझ्या मनातला भाव माझ्या मनास अलगद भिडून गेला...

न जाणे काये जादु झाली अशी ती कि तुझ्यात गुंतत गेले मी...

शब्दांनी न बोलता मनाने जुळत गेली मी...

आयुष्य हे समुद्रा सारखं झालयं

सकाळच्या भरती सारखं सुख भरभरून आणतं....

आणि संध्याकाळी ओहोटी होऊन सारं घेऊनही जात....

खर प्रेम म्हणजे नेमकं असते तरी काय?

Love at First Side की मैत्रिलाच Bye Bye

नुसतच असतं आकर्षण की तिच्या /त्याच्यासाठी काही पण असतो

नुसता अट्टहास की करतो प्रेमासाठीचा त्याग

असते घरच्यांच्या सहमतीची पाहिलेली वाट कि असतो पळून घातलेला लग्नाचा हा घाट.

एक विरह शब्दांचा मनानी मनाशी जोडणा-रा भावनांचा...

एक विरह मतभेदांचा जवळ असूनही न जुळणा-या धाग्यांचा...

एक विरह अबोल्याचा खुप बोलायचं असुनही शांत रहाणा-या ओठांचा...

एक अंथरलेला आभाळ...

तो मंतरलेला पाऊस...

या पाऊस धारांनी चल चिंब आता होऊ...

सुख क्षणाचे सोबती मग येतील भेटाया ते...

या चिंब पाऊसाळी मन दाटुन येते...

क्षण सुखांचे ओंजळी मग जपावेसे वाटे...

तुझ्या हृदयात मला अशी जपून ठेव जसे शंखातल्या मोतीस जपावे

तुझ्या मनाच्या कोप-यात घट्ट रोवून बसावे

थंडीतली ऊब आणि हिवाळयातील धुप माझी तुच असावे.

ऊन्ह कोवळे स्पर्शुन गेले श्वासात श्वास हा थांबला कोवळया उन्हातला अंधा-या रात्रीचा तो भास मज देवूनही गेला...

विरह हा तुझा...

मुक्या भावनांनी मी मांडला...

अबोल्या शब्दांचा हा खेळ सारा तुझ्या श्वासात थांबला...

शब्द अधुरे राहतात...

जेव्हा मन बोलायला लागतं...

पापण्याही ओलावतात जेव्हा तुझा ध्यास मनाला लागतो...

शांत होता चंद्र...

अशांत होती रात...

निशब्द मनातील विचारास मग बोलते केले आज...

स्पर्श हा तुझा नवखा मज कळला....

श्वासात श्वास थांबून मग हात हाती गेला....

विनवणी नव्हती जणू ती....

अस्पृष्ठ आस माझी ती....

नजरेला नजर भिडवत मग होकार हा घडला....

क्षण असा होता तो

स्वप्नात घेऊन गेला....

अनोळखी या दोन मनांना ओळखीचं करून गेला....

बघता-बघता दोन क्षण स्तब्ध असे झाले....

एकमेकांचे विचार जुळत

मनही जुळत गेले...

गुपीत या मनाचे...

न सांगता ओळखले....

माझ्या मनाचे अबोल भाव....

शब्दांविना गवसले...

लिहीता- लिहीता संख्या संपेल....

शब्दांचा कोशच हरवेल....

प्रेमाची व्याख्या ती

शोधूनही सापडणार नाही....

गुपीत या मनाचे शब्दांत मांडता येणार नाही ...

कणभर मागून

ओंजळभर दिलसं..

सुखाच्या सरिने

मन चिंबही केलंस...

मागणे अजून नाही काहीच

सावली होऊन नेहमीच राहील...

तुझ्या डोळ्यातील स्वप्नांना

मी माझ्या नजरेने पाहीन ...

चार भिंतीच नाही त्या

आठवणींचा पेटारा आहे...

हृदयाशी जोडून ठेवलेल्या क्षणांचा

असा न सावरलेला पसार आहे...

फुंकर मारून उडून जावे

तसे दिवस सरून गेले...

उरलेल्या दिवसांची प्रत्येक घटका

स्वतः मोजत मी गेले...

आंनद कि दुःख हे

काहीच समजेनासे झाले...

अंतरपाटाच्या समोर राहून

हळदीने मी न्याहले...

इतकाच होता का गं प्रवास माझा

आठवणींचा पेटारा आहे...

तुझ्या सोबत जगण्याचा....

या उंबर्यापलिकडील जग मग

एकटीनेच सावरण्याचा....

हात दिलास ह्यांच्या हाती

तुझ्याच संस्कारांची शिदोरी गाठी....

जगून घेऊदे क्षण हा

तुझ्यासोबत असण्याचा....

इतकाच होता का गं प्रवास माझा तुझ्या सोबत जगण्याचा.......

ऋणानुबंध हे जन्मजन्माचे

हाती हात तुझा असावा...

मनगठी हा हिरवा चुडा

भाळी कुंकू तुझ्याच नावी ठसावा...

हळदी-कुंकूने भरल्या वाट्या...

काळे मनी त्यास शोभून दिसे...

पती-पत्नीचे हे गोड नाते

सप्तपदीने खुलून उठे...

नथीच लाजन ...

पैंजन हे वाजलं...

सुबक आहे आज माझाच तोरा...

या गोड क्षणांचा सोहळाच खूप न्यारा....

या लाटेचा गारवा...

तुझ्या स्पर्शातुन भासे...

सोबतीने साथ तुझी...

हाती हात असेल ...

नभातील चांदणी मी...

माझा तारा होऊन रहा...

विश्वासाचा बंध तू...

असाच जोडून रहा...

व्याख्याच नाही त्याची काहीच...

अर्थ सांगू तरी कशी...

आभाळभर सुख हे माझे मी....

मापात मोजू तरी कशी...

ढाळले अश्रू माझे जरी हे...

वेदना तुला होतात...

सुख मागून दुःखाच्या झळा ...

माझ्या तुलाच बसतात...

इतके प्रेम करतोस कसे रे...

हे सांग तरी एकदा...

माझ्यावरच्या तुझ्या प्रेमाला ...

नव्याने शब्दांत मांड तरी एकदा ...

मिठीत तुझ्या शांत होऊन रहावं...

तुझ्यासवे असताना सारं विसरून जावं...

आठवणींच्या क्षणांना नव्याने जगावंं...

आपल्यातल्या नात्याला थोडं दोघांनीही समजावं...

थोड तुझं ..

थोड माझं म्हणतं

हरवलेल्या सुखाला नव्याने शोधावं...

किती साथ दिलीस तू आजवर

पण थकलास नाही कधीच...

माझ्यासारखीच न थांबण्याची वृत्ती

उराशी धरली होतीस अधीच....

दोन पावलांवरचा प्रवास तुझा तू

शंभर कोस नेलास ....

सावरताना मला पण तू कधीच नाही पडलास...

शक्य तितका आजवर संयमही तूच दिलास..

माझ्याच कठीण काळात मग माझा धिरही तूच झालास...

आज तुझ्यापासून सुरू झालेला प्रवास माझा

पुढे तुझ्यावरच संपेल...

तुलाच हाताशी धरून बग हे जग मी जिंकेल

अशीच साथ देशील ना हे वचन दे तू मला...

रे माझ्या camera सतत असाच राहशील ना रे तू बरा...

न्याय ही तुझाचं होता....

न्यायाधीशही तुच झालीस....

तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाच्या कबुलीने,

मग माझ्या उष्ट्या हळदीने तू न्हालीस ...

प्रेमाचा गुन्हा माझा तो

माझी वकीलीही तुच केलीस !....

सप्तपदींच्या सात वचनात

जामीनही तुच दिलीस....

गुन्हा फक्त एकच होता

त्याला कलम कोणताच नव्हता....

मग पत्नी रूपाने तू माझ्या

आयुष्यात आलीस....

कलमाची गरज नाही काहीच...

जन्मठेप ही सुखाची सहजच मिळाली...

सावधान म्हणत आयुष्याला...

सुरूवात नव्याने झाली

प्रशंसापत्रे

नवीन कविता माहिती

तुमचा ई-मेल टाका नवीन कविता माहिती साठी